अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- गेल्या अनेक दिवसांपासून कौठा, चांदे, हिवरा, देडगाव परिसरात फिरणारा बिबट्याने रविवारी रात्री कौठा येथील बोरकर यांच्या वस्तीवरील शेळी फस्त केली.
नेवासे तालुक्यातील चांदे,कौठा,देडगाव व परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने नागरिकांचा शेतीकामावर परिणाम होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी देडगावला एक बिबट्या जेरबंद केला होता.
त्यानंतर पुन्हा बिबट्याचा वावर या परिसरात आढळला आहे. कौठा येथील बोरकर या शेतकऱ्यांचे शेळी रात्री उसात नेऊन फस्त केली. या शेळीचा पंचनामा करण्यात आला.
तर काही शेतकऱ्यांनी हा बिबट्या मोकळ्या रानात बसलेला पाहिल्यावर अनेकांमध्ये भीती पसरली आहे. बिबट्याचा संचारामुळे अन्य प्राणी मारले जात आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उसाचे जास्त क्षेत्र असल्याने त्याला दडून बसण्यास जागा मिळत आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com