कोरड्या विहीरीत पडलेला बिबट्या जेरबंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-कान्हूरपठार शिवारात भक्ष्याचा पाठलाग करताना कोरड्या विहीरीत पडलेल्या बिबट्यास पारनेर वनविभाग, नगरच्या वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिम व ग्रामस्थांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद केले आहे.

बुधवारी (दि.१३) दुपारी दोन वा. कान्हूरपठार ते गारगुंडी रस्त्यावरील हनुमंत लोंढे यांच्या कोरड्या पडलेल्या सुमारे चाळीस ते पन्नास फुट खोल विहीरीत बिबट्या असल्याचे शेतकरी रामदास लोंढे व त्यांच्या पत्नी सीताबाई यांनी पाहिले.

याबाबत तात्काळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी पत्रकार सतीष ठुबे व भास्कर पोपळघट यांच्याशी संपर्क साधला असता पारनेर वनविभागास कळविण्यात आले.

त्यानंतर पारनेर वनपरिक्षेत्र विभागाचे अश्विनी दिघे, वनपाल सी.ए. रोडे, वनरक्षक निर्मला शिंदे, गजानन वाघमारे, निलेश बढे, डि.के.तिकोणे, व्ही.जी. सुर्यवंशी, एस.टी. सुद्रीक,

नगरचे आकाश जाधव, प्रमोद खामकर यांच्या नेतृत्वाखाली वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिमने ग्रामस्थांच्या मदतीने मोहिम सुरू केली. सुरवातीला पिंजऱ्यात भक्ष्य ठेवून पिंजरा विहीरीत सोडण्यात आला. बराच वेळ बिबट्या पिंजऱ्यात जात नव्हता.

शेवटी वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिमच्या सदस्याने विहीरीत उतरून बांबूच्या सहाय्याने बिबट्यास पिंजऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. शेवटी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

 वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24