Ahmednagar News : बिबट्या, रानडुक्कर, कोल्हा, या वन्यप्राण्यांमुळे शेती बागायतीचे अतोनात नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. बिबट्या, रानडुक्कर, कोल्हा, या वन्यप्राण्यांमुळे शेती बागायतीचे अतोनात नुकसान होत असून,

याबाबत दखल न घेणाऱ्या वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. दिवसा ढवळ्या गावात बिबट्याचा संचार पहावयास मिळतो. काही दिवसांपुर्वी गावात कवळेवस्ती परिसरात मेंढी व शेळीला मारल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे वनविभाग आता बिबट्याकडून माणसे मारण्याची वाट बघत आहे का, असा सवाल ग्रामस्थांमधून विचारण्यात येत आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी गावात तसेच शेतात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी गेले असता,

अनेकांना बिबट्या दिसून आला आहे. परिसरात बिबट्याचा संचार वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबटयाच्या भीतीमुळे शेतकरी रात्रीच्यावेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यास धजावत नाहीत,

एकीकडे वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असताना आता बिबटया दिसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबटयाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe