अहमदनगर बातम्या

महायुतीच्‍या उमेदवाराला पाठबळ देवून जिल्‍ह्याच्‍या विकासाचा मार्ग आपण सर्वजण धरुयात : विखे पाटील

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : विकासाला प्राधान्य देतानाच, संस्कृती परंपरेचा वारसा जतन करण्याचे महत्वपूर्ण काम विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आयोध्येतील एैतिहासिक श्रीराम मंदिराची निर्मिती करून कोट्यावधी हिंदूच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राहुरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री.खंडोबा यात्रेच्या निमित्‍ताने मंत्री विखे पाटील यांनी दर्शन घेतले. यात्रा उत्सवात सहभागी होवून त्यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या. तालुक्‍यातील विविध गावात त्यांनी मतदारांशी संवाद साधून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निर्णयाची माहीती दिली.

देशाला आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा आहे. विकासाचे उद्दीष्ट साध्य करतनाच भारताच्या संस्कृती आणि परंपराचा वारसा जगासमोर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वर्षानुवर्षे श्रीराम मंदीराचा प्रश्न जाणीवपुर्वक प्रलंबित ठेवला गेला.

यासाठी मोठा संघर्ष झाला, अनेकांना बलिदान द्यावे लागले. पण आयोध्येत श्री.राम मंदीर उभारणीचे दिलेले आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाले. कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करून आयोध्येला आता आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र पर्यटनाचे केंद्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

उज्जैन येथील महाकालेश्वर मंदीर, काशी विश्वेश्वराचा कारिडॉर आणि समुद्रामध्ये जावून मोदीजींनी मथुरेच्या भूमीची केलेली पूजा, देशाच्या अध्यात्मिक परंपरेची ओळख जगामध्ये पोहचवली असल्याचे विखे पाटील म्हणाले.

मागील दहा वर्षात भारताला विकसनशील राष्ट्र बनविण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना यशस्वी झाल्या आहेत. योजनांमुळे समाजातील शेवटचा घटक विकासाच्या प्रक्रीयेत आला, सामाजिक सुरक्षे बरोबरच देशाच्‍या सुरक्षेलाही केंद्र सरकारने महत्‍व दिले.

नगर जिल्‍ह्यातील असलेल्‍या वारसा स्‍थळांचाही विकास करण्‍याचा निर्णय घेण्यात आला असून, तिर्थक्षेत्र पर्यटनातून रोजगार निर्माण करणे हेच उदिष्‍ठ आहे. जिल्‍ह्यातील युवकांना रोजगार निर्मितीसाठी नगर तालुक्‍यात औद्योगिक वसाहतीला जागा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली असून,

अनेक उद्योग आता जिल्‍ह्यात येण्‍यास तयार झाले आहेत. केंद्रात पुन्‍हा भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार आहे. राज्‍यातही महायुतीचे सरकार आहे. त्‍यामुळे निधीची कमतरता विकास कामांना कमी पडणार नाही.

केवळ दहा जागा लढविणा-यांची आश्‍वासनं या फक्‍त भुलथापा आहेत. अनेक वर्षे जिल्‍ह्यात येवून केवळ भांडल लावण्‍याचे आणि जिल्‍ह्याला विकासापासून वंचित ठेवण्‍याचे काम जाणत्‍या राजांनी केले. ही लढाई आता नगर जिल्‍ह्याच्‍या स्‍वाभिमानाची आहे. त्‍यामुळेच महायुतीच्‍या उमेदवाराला पाठबळ देवून या जिल्‍ह्याच्‍या विकासाचा मार्ग आपण सर्वजण धरुयात असे शेवटी विखे पाटील म्‍हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office