वाद न घालता विकास कामे मार्गी लावू : आमदार लंके

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-राज्यात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या तिनही पक्षांचे सरकार असून या आघाडीच्या सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे करत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पारनेर – नगर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावर मतदारसंघाची जबाबदारी टाकल्याने स्थानिक पातळीवर वाद न घालता आघाडीच्या सर्व घटक पक्षांना समान न्याय देऊन विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.

आमदार लंके यांच्या स्थानिक विकास निधीतून १७.५० लाख रुपये खर्चाच्या भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन खोल्यांचे भूमिपूजन आमदार लंके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार लंके म्हणाले,

राज्यातील आघाडी सरकारचे मार्गदर्शक देशपातळीवरील ज्येष्ठ नेते शरद पवार व राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम आपण करणार असल्याचे ते म्हणाले. तर भाळवणी येथील दोन खोल्यांबरोबरच उरलेल्या सर्व खोल्यांचे यापुढील काळात करू असेही त्यांनी सांगितले.

तिनही पक्षांचे तालुकाप्रमुख भाळवणीत असल्याने स्थानिक पातळीवर कोणतेही वादविवाद न करता आघाडीतील सर्वच नेत्यांच्या सहकार्याने हे काम मार्गी लावू असे आ लंके यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24