अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी सभासदांना शताब्दी महोत्सवा निमित्त दिलेल्या घडयाळ खरेदीत जवळ जवळ ३५ लाख रुपयांचा अपहार केला असून,
वेळोवळी सभासद म्हणून आम्ही या व्यवहाराची कागदपत्रे बॅंकेकडे मागून देखील सभासदांचा हक्क असताना न्यायालयीन प्रक्रिया या नावाखाली
संबंधित कागदपत्रे देण्यास बँकेच्या प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी मा. उपनिबंधक यांनी बॅंक प्रशासनास दोन वेळा स्पष्ट लेखी आदेश देऊनही खोटी कारणे दाखवून माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी हे देखील या भ्रष्टाचारात सहभागी असून तत्कालीन बँकेचे अध्यक्ष साहेबराव अनाप व प्रशासनाने संगनमताने सभासदांची आर्थिक लूट केलेली आहे.
कर नाही त्याला डर कशाला हवी. वर्षभरापासून अर्ज विनंत्या करुन देखील घडयाळ खरेदीबाबत कागदपत्र दिली जात नाहीत. जे घडयाळ बाजारात फक्त ३oo रुपयांत विकत मिळते.
त्या घडयाळाची किम्मत सत्ताधाऱ्यांनी ६०० रुपये लावली आहे. या संबंधातील सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध असून आम्ही सनदशीर मार्गाने मा डी. डी. आर यांनी नियूक्त केलेल्या चौकशी अधिकाऱ्यांकडे दिनांक ६ जानेवारी रोजी देणार आहोत.
चौकशी सुरू झाली असून चौकशी अधिकारी मा. खेडेकर साहेब यांचे पत्र प्राप्त झाले असून आम्ही चौकशी कामी उपस्थीत राहणार आहोत.
चौकशीअधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून आम्ही उपस्थीत राहूण आमची सभासदहितासाठीची बाजू मांडणार आहोत. परंतू चौकशी अधिकाऱ्यांकडून न्याय न मिळाल्यास प्रसंगी वरिष्ठ कार्यालय
व न्यायव्यवस्थेकडे देखील न्याय मागणार आहोत .बॅंक प्रशासनाने केवळ माजी अध्यक्ष साहेबराव अनाप यांच्या दबावामुळे आम्हाला अद्यापपर्यंत कागदपत्र दिलेली नाहीत.
याविरोधात मंगळवार दिनांक २२ रोजी आम्ही डीडीआर कार्यालयात घंटानाद आंदोलन केलेले आहे. घडयाळ घोटाळ्याचा पर्दापाश करण्यासाठी जर आम्हाला कागदपत्रे मिळाली नाहीत,
तर प्रसंगी कोर्टात जाऊन दाद मागूच पण घड्याळ घोटाळ्याचा पर्दाफाश करूच असा इशारा गुरूमाऊलीचे अध्यक्ष विकास डावखरे यांनी घंटानाद आंदोलना प्रसंगी दिला आहे.