कोरोना परिस्थितीतही आरोग्य विभाग व ग्रामपंचायतमध्ये लेटरवॉर, ग्रामस्थांमधून संताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून तालुका प्रशासनाने जाहीर केले आहे.

असे असले तरी कोरोना सारख्या भयानक परिस्थितीतही या गावात आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत सुरु केलेल्या

लेटरवारमुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. लोहसर येथे कोरोनाचे २३ रुग्ण आढळून आले असून

या रुग्णवाढीचे खापर सत्ताधारी गटाने आरोग्य विभागावर फोडत त्यांच्या निष्काळजीपणाबाबत ग्रामपंचायतने वरिष्ठांना पत्र देऊन त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे दिला आहे.

तर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आरोग्य विभागाला सहकार्य करत नसल्याबाबतच्या तक्रारी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या कानी घातल्याने

ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्यात सुरू झालेल्या या आरोपाच्या लेटरवॉरमुळे सर्वसामान्य ग्रामस्थ मात्र हतबल झाले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24