Ahmednagar News : सध्या राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नगरमध्येही दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शहरात व उपनगरांत रस्त्यालगत पाणी साचत आहे. या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असून त्यामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
तसेच साचून राहिलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे, डासांमुळे साथीचे आजार वाढले आहेत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी पूर पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगर शहरातील सीना नदीला देखील गतवर्षी पूर येऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
यंदा अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगर शहरातील सीना नदीला देखील गतवर्षी पूर येऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
अनेक घरांत पाणी शिरले होते. यंदाही शहरात पावसामुळे पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सज्ज राहत आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
सध्या राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नगरमध्येही दररोज पाऊस हजेरी लावत आहे. शहरातून वाहत असलेल्या सीना नदीला गतवर्षी पूर येऊन पुराचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये घुसले होते. यामुळे नागरिकांचे नुकसान होऊन त्रास सहन करावा लागला. नागरिकांचे नुकसान होऊ नये, नागरिकांच्या घरांत पाणी शिरू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात.
शहरात दररोज होत असलेल्या पावसामुळे साथीचे आजार बळावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पाणी साचून राहत असलेल्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. शहर व उपनगरांत अंतर्गत काही रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात यावी, असे आ. जगताप यांनी पत्रात म्हटले आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नाले व गटार साफसफाई करणे आवश्यक आहे. त्याबाबत यापूर्वीही महापालिका प्रशासनाला वारंवार सूचना दिलेल्या आहेत. यंदा महापालिका प्रशासनाने नाले साफसफाईची मोहीम राबविली; परंतु काही ठिकाणी ओढ्या-नाल्यांची साफसफाई झाल्याचे दिसून येत नाही.
जास्त पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तातडीने पाणी जाण्यास अडथळा निर्माण करणारे प्रवाह मोकळे करण्यात यावेत.अशी मागणी आ. जगताप यांनी पत्राद्वारे केली आहे.