Ahmednagar News : बहुचचींत संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील १३ कोटी ३८ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी १७ जणांना कोर्टाने शिक्षा ठोठावली. पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानदेव वाफारे,
त्यांची पत्नी सुजाता वाफारे, रविंद्र विश्वनाथ शिंदे, साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर व संजय चंपालाल बोरा या पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
इतर १२ जणांना वेगवेगळ्या कलमान्वये सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी या खटल्याचा निकाल बुधवारी (दि. १०) दिला.
१७ आरोपींना भादविकच्या १७७, ४०६, ४०९, ४१७, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) व महाराष्ट्र ठेविदारांचे हितसंरक्षक कायदा १९९९ ‘च्या कलम ३ प्रमाणे दोषी ठरवून सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
या खटल्यात आरोपी उत्तम दगडू चेमटे, विश्वनाथ गणपत व्यवहारे, प्रविण रामदास पारेख, बाळासाहेब गोपीनाथ सुंबे व भद्रीनारायण भवरीलाल वर्मा हे पाच मयत असल्याने त्यांच्याविरुद्ध खटला अँबेट झालेला आहे. तसेच आरोपी अमोल प्रविण पारेख, जितेंद्रकुमार पारेख व निर्माल विजय गायकवाड हे फरार घोषित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध खटला प्रलंधित आहे.
सदरील खटल्यामध्ये लेखापरिक्षक देवराम मारूतीराव बारस्कर यांनी १ ऑगस्ट २०२१ रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी संगनमताने बेकायदेशीररित्या कर्ज वाटप केले, ठेविदारांची फसवणूक केली, गैरव्यवहार केला,
अशा प्रकारचा आरोप ठेवण्यात आला होता. संगणमताने पतसंस्थेचे सभासद, ठेविदार यांचे १३ कोटी ३८ लाख ५५ हजार ६६७ रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आरोपींविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण २८ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, लेखापरीक्षक तसेच पंच व ठेविदारांचा साक्षीपुरावा नोंदविण्यात आला. तपासी अधिकारी व्ही. एम. पवार यांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने पुरावे कोर्टात सासदर करण्यात आले.
अँड. अनिल ढगे यांनी सरकार पक्षाच्या वतीने युक्तीवाद केला. त्यांना सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी विशेष सहकार्य केले. अवसायक मंडळाच्या वतीने अँड. सुरेश लगड तर ठेविदारांच्या वतीने अँड. अनिता दिघे यांनी काम पाहिले. दरम्यान मागील आठवड्यात कोर्टाने आरोपींना दोषी ठरविले होते. त्या आरोपींना बुधवारी शिक्षा ठोठावण्यात आली.
शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे
१) ज्ञानदेव सबाजी वाफारे (जन्मठेप) २) सुजाता ज्ञानदेव वाफारे (जन्मठेप) ३) रविंद्र विश्वनाथशिंदे (जन्मठेप) ४) संजय चंपालाल बोरा (जन्मठेप) ५) साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेबभालेकर (जन्मठेप) ६) सुधाकर परशुराम थोरात (१० वर्ष सश्रम कारावास) ७) भाऊसाहेब कुशाबा झावरे (१० वर्ष सश्रम कारावास) ८) दिनकर बाबाजी ठुबे (१० वर्ष सश्रमकारावास) ९) राजे हसन अमिर (१० वर्ष सश्रम कारावास)१०) बबन देवराम झावरे (१० वर्ष सश्रम कारावास) ११) लहू सयाजी घंगाळे (१० वर्ष सश्रम कारावास) १२) हरिचंद्र सावळेराम लोंढे (१० वर्ष सश्रम कारावास) १३) अनुप प्रविण पारेख (५ वर्ष सश्रम कारावास) १४) सुधाकर गोपिनाथ सुंबे (५ वर्ष सश्रम कारावास) १५) गोपीनाथ शंकर सुंबे (५ वर्ष सश्रम कारावास) १६) महेश बबन झावरे (५ वर्ष सश्रम कारावास) १७) संगिता हरिश्वंद्र लोंढे (५ वर्ष सश्रम कारावास).