कृषी विधयेकावरील बंदी उठवा; भाजपाची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- केंद्राने कृषी विधेयक सादर केल्यापासून देशातील अनेक शेतकरी संघटनांबरोबरच विरोधी पक्षांनी देखील रस्त्यावर उतरत निदर्शने केली.

एकीकडे विरोधी पक्षाकडून या विधेयकाला विरोध केला जात आहे तर दुसरीकडे भाजपने याचे समर्थन केले आहे. राज्यातील महाआघाडी सरकारने केंद्राच्या कृषी विधेयकावरील बंदी उठवावी व शेतकरी हिताचे हे कृषी विधेयक राज्यात लागू करावे,

अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवासे तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली. नेवासे भाजपच्या वतीने तहसीलदार रुपेश सुराणा यांना देण्यात आलेल्या निवेदनात, ‘केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या जिवनात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी ऐतिहासिक कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांना प्रस्थापितांच्या जाचातून मुक्त करण्याचे काम केले आहे.

राज्य सरकारने ही स्थगिती उठवावी व कृषी विधेयक राज्यात लागू करावे, यासाठी अशी मागणी केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, उपाध्यक्ष राजेश कडु, जिल्हा सचिव भाऊ नगरे, आप्पा गायकवाड, ज्ञानेश्वर टेकाळे,

सह कोषाध्यक्ष संजय गवळी, माऊली पेचे, सचिन नागपुरे, सतिष गायके, संदिप आलवणे, प्रताप चिंधे, प्रशांत बहिरट यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24