अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील कौठा या ठिकाणी शनिवार (दि.10) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या पावसात कांदा वाखारीवर वीज कोसळून सुमारे 500 गोणी कांदा जळून खाक झाला आहे.
कोरोनाच्या या संकटमय काळात या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या कांद्याला चांगला बाजार असल्याने शेतकरी खुश आहे. मात्र अजून बाजार वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने वाखारीत साठवलेला कांदा काही दिवस ठेवून नंतर पैसे करून घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.
कौठे येथील शेतकरी सूर्यवंशी यांनी सुमारे 500 गोणी कांदा असाच वखारीत साठवून ठेवला होता. मात्र या वखारीवर वीज पडली. त्यामुळे निम्मा कांदा विजेच्या आगीत सापडला.
शिवाय रात्रभर पाऊस सुरु असल्याने राहिलेला कांदा पाण्याने खराब झाला. त्यामुळे सूर्यवंशी यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकाचे निसर्गानेच नुकसान केले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी भावना कौठे येथील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved