Ahmednagar News : आयोध्या येथे उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पार पाडणार आहे. या ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण देशभर प्रभू श्रीरामांचा जयघोष केला जाणार आहे.
त्या अनुषंगाने पाथर्डी तालुक्यातील मिरी व करंजी या मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये या दिवशी सर्व दारू व मटन विक्रीचे दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश या दोन्ही गावच्या ग्रामपंचायतीने पत्रकाद्वारे काढले आहेत.
सुमारे पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे भक्तिमय वातावरणात पार पडणार असल्याने या दिवशी सर्व जाती-धर्माचे लोक या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
प्रत्येक गावात विविध धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे करंजी मिरी या ठिकाणी देखील ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून,
या दिवशी मिरी करंजी येथील सर्व दारू मटन चिकन मच्छी सारखी सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवली जाणार असल्याचे मिरी गावच्या सरपंच सुनंदा गवळी व करंजी गावच्या सरपंच नसीम रफिक शेख यांनी सांगितले.