दारू वाहतूक करणाऱ्या एकाला पकडले : राहुरी पोलिसांची कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राहुरी शहरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई करण्यात येऊन सुमारे ३२ हजारांची दारू पकडण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राहुरी शहरात अवैधरित्या वाहनांमध्ये दारूची चोरटी वाहतूक होत आहे,

अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी शहरांमध्ये पाठवून वाहनांमध्ये अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावून राहुरी शहरांमध्ये एक टाटा इंडिका क्र. एमएच १४ ए एम ३७३२ या वाहनामध्ये आरोपी सोहेल शब्बीर शेख (वय २४, रा. वनकुटे, ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर) हा दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आला.

त्याच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याच्याकडून एकूण ३२ हजार १६० रुपये किंमतीची देशी व विदेशी दारू व १ लाख १० हजार रुपये किंमतीची टाटा इंडिका गाडी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राकेश ओला,

अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, उपनिरीक्षक बोडखे, सहाय्यक फौजदार गीते, हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड,

राहुल यादव, विकास वैराळ, विकास साळवे, संदीप ठाणगे, पोलीस नाईक प्रवीण बागुल, कॉन्स्टेबल नदीम शेख, प्रमोद ढाकणे, गोवर्धन कदम, सतीश कुराडे, सचिन ताजने, अमोल गायकवाड, सम्राट गायकवाड, जयदीप बडे, आजिनाथ पाखरे, दादासाहेब रोहकले यांनी केली.