अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ रस्त्यावर तब्बल १३ लाखांची दारू जप्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : नगर-दौंड रोडवर हॉटेल श्रावणीसमोर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ लाखांच्या विदेशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

संदीप बबन सानप (वय २८, रा. सानपवस्ती, मेहकरी, ता. नगर), राम नवनाथ जाधव (वय २५, रा. एस्सार पंपाशेजारी, वाळकी, ता. नगर), पांडुरंग नवनाथ जाधव (वय २१, रा. एस्सार पंपाजवळ, वाळकी, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दौंड रोडवरील खडकी शिवारात हॉटेल श्रावणीसमोर राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई, नाशिक व अहमदनगर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यावेळी तिथे महाराष्ट्रात बंदी असलेली गोवा राज्यातील विदेशी दारूचा साठा आढळून आला. याप्रकरणी तिघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १२ लाख ९७ हजारांची विदेशी दारू जप्त केली.