अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली.
परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान त्याला माल पुरवठा करणार्या राहाता तालुक्यातील निमगाव परिसरातील साहिल विजय चोपडा व वैभव शांतीलाल चोपडा या दोघा चुलत्या पुतण्यालाही काल अटक करण्यात आली.
राज्यात गुटखा विक्री, साठा, वाहतूक, वितरण आणि उत्पादन यावर अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई यांच्या 15 जुलै 2014 च्या अधिसुचनेद्वारे प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे देशातही तंबाखू मिश्रीत गुटखा विक्रीस बंदी आहे.
मात्र, अशाही परिस्थितीत चोरट्या मार्गाने गुटख्याची विक्री, साठा, वाहतूक, वितरण सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव मंगळवारी सकाळी एकलहरेतील आठवाडीत समोर आले. परिसरातील गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी सलमान तांबोळीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केल्यानंतर चौकशीत थेट एकलहरे ते राहाता कनेक्शन उघड झाले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved