अहमदनगर बातम्या

दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव शहरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. महेश भाऊसाहेब मंचरे (वय २५, गोटुंबे आखाडा (ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मच्छिंद्र परसराम पोकळे (रा. ओमनगर, कोपरगाव) यांची दुचाकी घरासमोरून चोरीला गेली होती. पोकळे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सदर दुचाकी मंचरे याने चोरली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आरोपी मंचरे याला अटक केली.

त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी मंचरे विरोधात कोपरगाव शहर, संगमनेर, कर्जत, राहाता, लोणी, जालना तालुका (जि. जालना) पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल आहेत.

Ahmednagarlive24 Office