जिल्ह्यात वाजला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा बिगुल!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar elections : राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दि.१८ ऑगस्ट रोजी मतदान आणि दि.१९ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.

यात जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व एक नगरपंचायतीचा समावेश आहे. कार्यक्रम घोषित झाल्यापासूनच संबंधित शहरांच्या हद्दीत आचारसंहिता जारी झाली असून या दहा गावाच्या भोवती आगामी महिनाभरात इच्छुकांची मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवार रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

त्याची सुरुवात खरे तर राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सहा महिन्यापूर्वीच सुरू झाली होती. जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, शेवगाव, जामखेड, देवळाली, राहाता, पाथर्डी, राहुरी या नगरपालिका आणि नेवासे नगरपंचायतचा यात समावेश आहे.