‘लाॅकडाऊनच्या अफवाच, त्यात तथ्य नाही’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला.

परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. आता येथील  आठ दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या १४ जणांचे अहवाल शनिवारी आले. तिघे पॉझिटिव्ह असून उर्वरित ११ जण निगेटिव्ह आहेत,

अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. दरम्यान, येत्या दोन दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, या केवळ अफवा असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी स्पष्ट केले. तहसीलदार चंद्रे म्हणाले, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.

तेथील स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेतला. कोपरगावमध्ये लॉकडाऊन करण्यासंदर्भातील वृत्त चुकीचे आहे.

ज्या भागात रुग्ण आढळले, तोच भाग फक्त कंन्टेन्मेंट झोन जाहीर केला जात आहे. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24