अहमदनगर बातम्या

जिल्ह्यात निवडणूक कालावधीत शस्त्र बाळगण्यास मनाई जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

Published by
Ahmednagarlive24 Office

भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघ (३७) व शिर्डी लोकसभा मतदारसंघात (३८) येथे दि.१३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.

निवडणुक मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडल्या जावी यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार दि. 16 मार्च ते 6 जुन, 2024 या निवडणुकीच्या कालावधीमध्ये कोणत्याही इसमास शस्त्र परवान्यावरील शस्त्रे जवळ बाळगुन फिरण्यास सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.

Ahmednagarlive24 Office