अज्ञात व्यक्तीने मूरघास पेटविल्याने शेतकऱ्याचे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-सर्वसामान्य पशूपालक शेतकऱ्याने जनावरांना चाऱ्यासाठी मूरघासाच्या भरलेल्या बॅगा अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याने यात मुरघास जळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.(Shocking News)

ही घटना राहाता तालुक्यातील साकुरी येथे घडली असून, या घटनेने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. येथील शेतकरी महेश रोहोम हे सकाळी आपल्या गायींना चारा टाकण्यासाठी मूरघास काढण्यासाठी गेले असता

त्यांना मुरघासाच्या बॅग अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या तसेच बॅगजवळ आगपेटीच्या काड्या आढळून आल्या. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी वर्ग मकाचा मुरघास करून हवा बंद प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवतात बॅगच्या माध्यमातून जनावरांना नेहमी हिरवा चारा उपलब्ध होत असल्याने शेतकरी मक्याच्या मुरघासकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे.

अर्धवट बॅगा जळाल्याने या जळालेल्या बॅगेत हवा जाऊन पूर्ण मुरघास खराब होणार आहे. यामुळे रोहम यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत.

दूध दरात होणारी सततची घट, पशुखाद्याचे वाढत चाललेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच अशा पद्धतीचे संकट ओढवल्याने हतबल झाला आहे.

मका चारा विकत घेऊन बॅग भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला होता. यामुळे चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे, अशा विघातक, वाईट प्रवृत्तीचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.