खाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून लथाबुक्यांनी मारहाण करून दुकानाचे नुकसान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-खाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तिघा जणांनी संदिप आघाव यांना दगड व लाथा बूक्क्यांनी मारहाण करून दुकानाचे नूकसान केले. ही घटना राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील राहुरी खुर्द येथे दिनांक ३० जुलै रोजी घडली.

राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द येथील संदिप शिवराम आघाव यांचे राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत नगर मनमाड रस्त्याच्या कडेला कृष्णालक्ष्मी लेडीज शाॅपी नावाचे कापड दुकान आहे.

दिनांक ३० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान संदिप आघाव हे त्यांच्या दुकानात असताना या घटनेतील आरोपींनी त्यांना खाण्यासाठी पैसे मागितले.

त्यावेळी संदिप आघाव यांनी माझ्याकडे पैसे नाहीत. असे म्हणून पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपींनी संदिप आघाव यांना दगड व लाथा बूक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

तसेच त्यांच्या दुकानाची काच फोडून नूकसान केले. या घटनेत संदिप आघाव यांच्या डोक्याला दगड लागून ते जखमी झालेत. त्यांनी ताबडतोब पोलिस ठाण्यात धाव घेतली.

संदिप आघाव यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी सचिन फुगारे, मनोज शिरसाठ तसेच अक्षय साळवे सर्व राहणार राहुरी खुर्द. या तिघां विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एकनाथ आव्हाड हे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24