अहमदनगर बातम्या

गॅस पाईपलाईनचे खड्डे करतायत व्यावसायिकांचे नुकसान; ग्रामस्थांनी दिला इशारा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :-  नगर-औरंगाबाद महामार्गाच्या लगत गॅसच्या पाईपलाईन साठी खड्डा खोदून पाईपलाईन पुरविण्याचे काम सुरू आहे. हॉटेल, पेट्रोल पंप व इतर व्यावसायिकांच्या समोर खड्डा खोदून सुमारे दोन महिने झाले तरी ते बुजविण्यात आलेले नाहीत.

तसेच खड्डा खोदल्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचत असल्याने वाहन चालक वळत नसल्याने व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

दरम्यान खोदण्यात आलेल्या या खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे गॅस पाईपलाईनच्या काम करणाऱ्यांच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

काम करत असताना कंपनीचे अनेक वाहने रस्त्यावरच आडवी उभी करण्यात येत असल्याने अपघात घडत आहेत. तसेच कधी काहीवेळेस एकेरी वाहतूक करण्यात येत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असून कंपनीच्या विरोधात जेऊर परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

तसेच यापुढे कंपनीला काम न करू देण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिक व इतर व्यावसायिकांचे झालेले नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान संतप्त ग्रामस्थांकडून गॅसच्या पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंपनी विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office