अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात सर्वत्र नादुरुस्त रस्ते, खड्डे, यामुळे सव सामान्य नागरिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र याच नादुरुस्त रते व रस्त्यावरील धुळीमुळे सुपा परिसरातील कारखानदार चांगलेच हैराण झाले आहे.
उत्पादनाच्या चिंतेबरोबरच आता उत्पादकाला आता या धुळीचा त्रास सहन करावा लागतो आहे. पारनेर तालुक्यातील विस्तारित सुपा औद्योगिक वसाहतीतील एका मुख्य रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे.
त्यामुळे रस्त्यावरील माती, धुळीचे कण यामुळे येथील कारखानदार हैराण झाले आहेत. धुळीचा परिणाम कारखान्यातील उत्पादित मालाच्या गुणवत्तेवरच होत आहे.
येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे उठणाऱ्या धुळीच्या लोटांमुळे दुचाकी, चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह, पादचाऱ्यांना जेरीस आणले आहे.
त्यामुळे रखडलेले हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. कच्च्या रस्त्यावरील धूळ कारखान्यात येत असल्याने संगणक, सीएनसी मशिनरींना बाधा निर्माण होत आहेत.
तयार उपकरणांना पेंटिंग करताना धुळीच्या कणांच्या संसर्गाने उत्पादित मालाची गुणवत्ता व दर्जा यावर परिणाम होत आहे. याबाबत एमआयडीसीकडे तक्रार केली आहे व तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.