अहमदनगर बातम्या

Kukadi Water : शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळ्यात कमी पाऊस, कुकडी डावा कालव्यातून ओव्हर फ्लोचे आवर्तन सोडण्याचे आदेश !

Published by
Ahmednagarlive24 Office

Kukadi Water : कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे जनतेला पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत आमदार प्रा. राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कुकडीचे आवर्तन सोडण्याची मागणी केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने कुकडी डावा कालव्यातून ओव्हर फ्लोचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कर्जत तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

कुकडी लाभक्षेत्रातील शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या ठिकाणी यावर्षी पाऊस कमी झालेला आहे. जूलै महिना उजाडत आला तरी या भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने काही गावांमध्ये टँकर सुरू आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

पर्जन्यमान कमी झाला असल्याने तातडीने कुकडी डावा कालव्यातून ओव्हर फ्लो चे आवर्तन सोडण्याची आवश्यकता आहे. कुकडीचे ओव्हर फ्लोचे आवर्तन तातडीने सोडल्यास या भागातील जनतेला मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

ही बाब आमदार प्रा राम शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून देत आवर्तन सोडण्याची मागणी केली. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या समवेत आमदार सुरेश धस, कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य काकासाहेब धांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, नितिन पाटील, महेश तनपुरे, अनिल गदादे, प्रविण फलके सह आदी यावेळी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office