अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गाच्या पोखरी शिवारात स्विफ्ट कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारचा अपघात घडला. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गोपाल अंकुळनेकर वय ३३ रा. बोटा माळेवाडी असे या कार चालकाचे नाव आहे. पुणे नाशिक महामार्गाच्या पोखरी शिवारात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये कार पूर्णपणे पलटी झाली होती. दगडांमुळे ही कार दरीत कोसळण्यापासून वाचली. यावेळी मोठा अनर्थ टळला.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना समजताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.