अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- शेतातील कामे आटोपून घरी जाताना जनावरांना त्या दोघी मायलेकी घरी गेल्या मात्र अवघ्या काही मिनीटातच त्यांनी ज्या कडवळाच्या पेंढ्या कापून ठेवल्या होत्या त्याच पेंढीवर येवून बिबट्या असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण परिसरात घडली. श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील आमराईमळ्यात दि.१६ रोजी संध्याकाळी सहा वाजता संजय दत्तु कौठाळे यांच्या शेतात अरूण दादाभाऊ कौठाळे हे ट्रॅक्टरने मका पेरणी करत होते .
शेजारील वसंत कौठाळे यांच्या शेतात वसंत यांची पत्नी अनिता व लहान मुलगी प्रज्ञा या कडवळ कापून नुकत्याच घरी गेल्या होत्या.
काही वेळातच अनिता यांनी कापलेल्या कडवळाच्या पेंढीवरच बिबट्याा उभा असलेला अरूण कौठाळे यांनी पाहिला. थोडया वेळाच्या अंतराने या मायलेकीवरील संकट टळले होते .
जर या मायलेकी त्याच जागेवर असत्यातर अनर्थ झाला असता. त्यानंतर बिबट्यााने तेथून दुसऱ्या शेतात धूम ठोकली. त्याच परीसरात विश्वास कोकाटे यांचे दोन करडं या बिब्ट्याने फस्त केले आहेत.
यापूर्वी वाघमारे वस्ती परिसरात दिपक कौठाळे तसेच ग्रामस्थांनी बिबटया पाहिला आहे . त्यामुळे या ठिकाणी वनकर्मचारी हनुमंत रणदिवे यांनी पिंजरा लावला आहे .