अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-आजी-माजी सैनिक कुटुंबीयांच्या आरोग्य सेवेसाठी ई.सी.एच. च्या माध्यमातून शहरातील मॅक केअर हॉस्पिटल कार्यान्वीत झाले आहे.
या हॉस्पिटलच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना एका छताखाली अद्यावत आरोग्यसुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत पटारे, डॉ. सतीश सोनवणे, प्रशासन विभागचे पिंपळकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, निवृत्ती भाबड, शिवाजी गर्जे, संजय पाटेकर, भाऊसाहेब देशमाने आदी उपस्थित होते. डॉ. प्रशांत पटारे म्हणाले की, सैनिक सिमेवर देश रक्षणाचे कार्य करुन मोठे योगदान देत आहे. सैनिक करत असलेल्या देश रक्षणाच्या कार्याने प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे.
त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी मॅक केअर हॉस्पिटलने पुढाकार घेतला असून, हे मोठे भाग्याचे काम आहे. देशाचे रक्षण करणार्या आजी-माजी सैनिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी कटिबध्द राहणार असून, त्यांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचे समाधान मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
जिल्हातील आजी-माजी सैनिक, सैनिक पत्नी, शहीद परिवारसाठी ई.सी.एच. च्या माध्यमातून मॅक केअर हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा मिळणार आहे. हॉस्पिटलमध्ये पुर्ण वेळ कॅन्सर तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, मुत्रपिंड विकार तज्ञ, मेंदु व मणके तज्ञ, ह्रद्य रोग तज्ञ, मधुमेह तज्ञ, फुप्फुस रोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ कार्यरत आहेत.
तर अद्यावत सोयी-सुविधायुक्त सर्व रोग निदानासाठी उपायुक्त ठरणार आहेत. सर्व प्रकार रोगाचे निदान व उपचार प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले आहे. आजी-माजी सैनिक कुटुंबीयांच्या आरोग्य सेवेसाठी ई.सी.एच. च्या माध्यमातून शहरातील इतर सात खाजगी हॉस्पिटल देखील सेवा देत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved