कृषीपूरक जोड धंद्यातून बळीराजा अधिक सुखी व समाधानी करण्यासाठी महापशुधन एक्स्पो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. पशुपालक शेतकऱ्यांना पशुधनाची नवनवीन माहिती तसेच आधुनिक पशुसंवर्धन करण्याची संधी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून येथे झालेल्या महाएक्स्पोमुळे लाखो शेतकऱ्यांना लाभली आहे,
असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिर्डी शहरात आयोजित तीन दिवसीय महापशुधन एक्स्पोचा काल रविवारी (दि.२६) समारोप करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ. जयकुमार गोरे, आ. राहुल कुल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,
महानंदा दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी आमदार वैभव पिचड, युवा नेते विवेक कोल्हे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव श्री गुप्ता, आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, विभागीय आयकत राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महसूलमंत्री विखे पाटील आणि खा. डॉ. विखे पाटील यांच्या पुढाकाराने साईबाबांच्या शिडीत आतापर्यंतचा सर्वात मोठा महापशुधन एक्स्पो झाला आहे.
राज्य लग्पीमुक््त करण्याचा निश्चय केला असून राज्यात पशुधन बाढले पाहिजे. पशुसंवर्धन बारमाही व्यवसाय आहे, त्याला पुढे नेलं पाहिजे. यासाठी प्रदर्शनात माहिती दाखविली आहे. हा महापशुधन एवस्पो शेतकर्यांना बरदान ठरणार आहे.
सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महसुलमंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठींब्याविना हा महापशुधन एक्स्पो शक्य नव्हता. राज्यात आपले सरकार आल्यापासून दुधाला भाव मिळाला आहे.
दुधात भेसळ करू नका. तुम्हाला देव देखील माफ करणार नाही आणि समाज देखील माफ करणार नाही. आपण राज्यात लम्पी आजारांवर मात केली नसती तर संपूर्ण दुग्ध व्यवसाय उध्वस्त झाला असता, असे विखे पाटील यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नगर जिल्ह्याची एक वेगळी ख्याती असून आगळावेगळा जिल्हा आहे. शिक्षण, साखर कारखानदारी, बँकींग क्षेत्रात अग्रेसर आहे. याबरोबरच सहकार क्षेत्रात नगर जिल्ह्याचे नाव असल्याचे सांगून महसूलमंत्री विखे पाटील यांनी हा महापशुधन एक्स्पो आयोजित केल्याचा फायदा राज्यातील सर्व पशुपालक शेतकरी वर्गाला होईल,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध प्रजातींच्या पशुंना घेऊन सहभागी झालेल्या ४० गटातील १२० पशुपालक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी आभार मानले.