३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : आज सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे मैदाने ओस पडत आहेत.त्यामुळे तरुण पिढीला पुन्हा मैदानाकडे वळवण्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उपक्रम उपयुक्त ठरेल.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचे एवढ्या मोठ्या स्वरूपात आयोजन करून महाराष्ट्रात इतिहास घडवला आहे.छत्रपती शाहू महाराजांनंतर कुस्तीला एवढे मोठे राजकीय पाठबळ आमदार जगताप यांनीच दिले आहे,असे गौरवोद्गार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यांत पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आशिष येरेकर,आयुक्त यशवंत डांगे, माजी आमदार अरुण जगताप, भाजपाचे महेंद्र गंधे, अभय आगरकर, संपत बारस्कर, सुभाष लोंढे, अनिल शिंदे, हिंदकेसरी योगेश दोडके, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, अशोक शिर्के, सईद चाऊस आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकाऱ्यांसह हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अतिशय भव्य दिव्य आयोजन आमदार संग्राम जगताप यांनी करून दाखविले आहे.त्यामुळे ही अतिशय उत्कृष्ट व सुंदर स्पर्धा नगरमध्ये होत आहे.वाडिया पार्क मैदानाचा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे.जसा नगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे,तसे सर्वात मोठे क्रीडा संकुल येथे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आ.संग्राम जगताप म्हणाले,महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर मध्ये होत असल्याचा सर्वाधिक आनंद मला होत आहे. या स्पर्धेचा दर्जा वाढवण्यासाठी व महाराष्ट्र बाहेर स्पर्धेचा नावलौकिक वाढावे यासाठी स्पर्धेचे बारकाईने नियोजन केले आहे.अनेक दानशूर यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हातभार लावला आहे.
माझे आजोबा स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप हे कुस्तीचे शौकीन होते. त्यांनी कायम कुस्तीगीरांना मदत व सहकार्य केले आहे.त्यांच्या पश्चात वडील व चुलत्यांनी हे काम केले.मी व भाऊ आता ही परंपरा पुढे चालवत आहे.लाल माती नम्रपणा शिकवणारी आहे.महाराष्ट्र केसरी किताब विजेत्यास जशी शासकीय नोकरी मिळते त्याच पद्धतीने द्वितीय व तृतीय येणाऱ्यास शासकीय नोकरीस सामावून घ्यावे अशी मागणी शासनाकडे करणार आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने व वाडियापार क्रीडा संकुलासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील पंधरा कोटी प्राप्त झाली आहेत.प्रास्ताविक जिल्हा सचिव डॉ.संतोष भुजबळ यांनी केले. खजिनदार शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी गणेश भोसले, संजय चोपडा, संभाजी लोंढे, प्रकाश भागानगरे, साहेबराव घाडगे, अभिजीत खोसे, बाबा सानप, अरविंद शिंदे, उप महाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, सुनील कोतकर, जितू गंभीर, विजय गव्हाळे, राजकुमार आघाव, विशाल बलकवडे, रवींद्र कवडे, संजय गिरवले, वसंत पवार, धनंजय खरमे, महेश लोंढे, गणेश कवडे, गोरख खंडागळे, अनिल शिंदे, दीपक खैरे, प्रशांत गायकवाड, ज्ञानेश्वर रासकर, महेंद्र गंधे ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब पवार, सुभाष घोडके आदि उपस्थित होते.