अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोनाचे संक्रमण दिवसंदिवस वाढत असून, इस्त्रायल सारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये यासाठी शाळा जून महिन्यात सुरु करण्याचा शासनाने अट्टाहास करु नये.
तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने कोरोनाचे संक्रमण अटोक्यात आल्यास शाळा सुरु करण्याचा विचार करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिले. इस्त्रायल जगातील त्या मोजक्या देशातील एक आहे ज्याने कोरोनावर मोठे नियंत्रण मिळवले होते. मात्र लॉकडाऊन शिथील करुन शाळा सुरु केल्याने सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग शाळांमध्ये पसरला.
यामुळे इस्त्रायल मध्ये 40 पेक्षा जास्त शाळा बंद करण्यात आल्या तर सात हजार शिक्षक आणि विद्यार्थ्यांना क्वारंनटाईन करण्यात आले. महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2020-21 ची सुरुवात 16 जून पासून सुरू करण्याचे संकेत शासनाकडून मिळत आहेत. परंतु सद्य परिस्थितीत कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसताना जून महिन्यात शाळा सुरू करणे योग्य होणार नाही.
कोरोनामुळे शाळा पुर्ववत सुरु करण्यास नवी आव्हाने उभी राहिली आहेत. मुलांमध्ये कोरोनासोबतची जीवनशैली घडवणे हे असणार आहे. मुलांमध्ये कोरोनाच्या बचावासाठी स्वयंशिस्त निर्माण करावी लागणार आहे.
कोरोनाने शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने बदल झाला असून, यासाठी पायाभूत सुविधा, पर्यायी व्यवस्था आदि बाबींचा विचार करावा लागणार आहे. कृपया शासनाने जुलैपर्यंत शाळा सुरू करू नये आणि पालक, शिक्षकांना दिलासा देण्याचे निवेदनात म्हंटले आहे. राज्यात लॉकडाऊन मध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासचा उपक्रम मे महिन्यात राबविला.
महाराष्ट्रातील जवळपास 75 टक्के पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. तर मुंबई महापालिका सारखे टॅबही उपलब्ध नाहीत. ही नवीन संकल्पना पालकांनी नाकारली आहे. लॉकडाऊनमुळे मुलांच्या खेळण्याची बागडण्याची उन्हाळी सुट्टी हिरावली गेली आहे. याबाबतीत पालक, शिक्षण तज्ञ, शिक्षक यांनी चिंता व्यक्त केली आहे. ऑनलाइन शिक्षण पूरक शिक्षण आहे.
ते शाळा सुरू झाल्यानंतर द्यावे असे विचार महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञांनी मांडले आहेत. शिक्षकांना मे महिन्यात हक्काची 36 दिवसांची सुट्टी मिळते. ती सुट्टी यावर्षी कोरोना संदर्भातील विविध ड्युटी आणि ऑनलाइन अभ्यास यामुळे हिरावली आहे. मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान झाले नाही.
त्यामुळे येणार्या शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सुरू झालेला ऑनलाइन अभ्यास बंद करावा आणि सर्व अभ्यास शाळा सुरू झाल्यावर सुरू करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने,
रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे,
सर्जेराव चव्हाण, इकबाल सर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर सर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे सर, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे सर, प्रदीप बोरूडे, युनूस शेख, ईकबाल काकर आदि प्रयत्नशील आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews