अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-राज्यघटनेवर निष्ठा, विचारांशी प्रामाणिकपणा, पक्ष नेतृत्वाची बांधिलकी, स्वच्छ चारित्र्य आणि अविश्रांत काम यामुळे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील व राज्यातील प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले.
त्यांचे कर्तबगार नेतृत्व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी काढले. आहे. थोरात हे तरुणांसाठी आयकॉन असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
वसंत लॉन्स येथे तालुक्यातील सर्वपक्षीय संस्था, सेवाभावी संस्था व अमृत उद्योग समूहाच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.
बाजीराव खेमनर, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, अनुराधा नागवडे,आदींसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पोटखराबा शेतकऱ्यांच्या नावे उतारे, गरजूंना रेशन कार्डचे वितरण यावेळी करण्यात आले. कोरोना योद्ध्यांचा सत्का करण्यात आला. नगराध्यक्ष तांबे यांच्या ओव्यांचे पुस्तकाचे व कारखान्याच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही झाले.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, मंत्री थोरात यांनी कधीही पक्षाकडे काही मागितले नाही. संविधान आणि पक्षावर त्यांची असलेली निष्ठा सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. सत्यजित तांबे म्हणाले, थोरात यांना कधी कोणीही रागावलेले पाहिले नाही.
सर्वांना सामावून घेत पुढे जाणारे त्यांचे नेतृत्व आहे. रणजितसिंह देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. दादाभाऊ मुंडे, अनुराधा नागवडे, दुर्गा तांबे, सचिन गुजर, करण ससाणे, सुरेश थोरात, उत्कर्षा ताई रुपवते आदींचीही भाषणे झाली.
यावेळी अजय फटांगरे, संतोष हासे, गणपतराव सांगळे, निखील पापडेजा, बेबीताई थोरात, अर्चना बालोडे, नवनाथ आंधळे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम उपस्थित होते.
प्रास्ताविक थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.