अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे, निवडणुक शाखाधिकारी ए.डी.रनवरे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख ग्रामस्थ उपस्थितीत होते. गुरूवारी दुपारी २ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत कढण्याच्या कामकाजाला सुरूवात झाली.
तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ सरपंच पदाचे दावेदार उपस्थित होते. त्यात ३८ ग्रामपंचायतीवर महीलांना सरपंच पदाचा मान मिळाल्याने या ठिकाणी महीला राज आले आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी ११ ग्रामपंचायती त्यात देर्डे को-हाळे, शहाजापूर, पोहेगाव, ओगदी, वेस सोयेगाव,
येसगाव या ६ ग्रामपंचायती महीलांसाठी तर रवंदे, कासली, दहेगाव बोलका, जेऊर कुंभारी, कान्हेगाव या ५ खुल्या प्रवर्गासाठी. अनुसुचित जातीसाठी १० ग्रामपंचायतीपैकी तिळवणी, माहेगाव देशमुख, कोकमठाण, चासनळी, मढी खु. या ५ ग्रामपंचायती महीला राखीव तर शिंगणापूर, मंजूर,
मायगाव देवी, डाऊच बु.कारवाडी या ५ ग्रामपंचारती खुल्या प्रवर्गासाठी. मागास प्रवर्गासाठी २० ग्रामपंचायती त्यात आपेगाव, सडे, मोर्वीस, चांदगव्हाण, घोयेगाव, शहापूर, कोळपेवाडी, गोधेगाव, डाऊच खु. रांजणगाव देशमुख या १० ग्रामपंचायतीवर महीला आरक्षण तर सांगवी भुसार, कोळगाव थडी,
हांडेवाडी, करंजी बु., देर्डे चांदवड, चांदेकसारे, आंचलगाव, लौकी, मनेगाव, मुर्शतपूर या १० ग्रामपंचायती खुला प्रवर्गासाठी. मळेगाव थडी, कुंभारी, सुरेगाव, वेळापूर, बक्तरपुर ,धारणगाव, जेऊर पाटोदा, उक्कडगाव, पढेगाव, तळेगाव मळे, वारी,खोपडी, सोनेवाडी, बहादराबाद, जवळके,
अंजनापुर आणि संवत्सर या १७ ग्रामपंचायती महीलांसाठी तर बोलकी, हिंगणी, काकडी मल्हारवाडी, धोत्रे, वडगाव, भोजडे,शिरसगाव सावळगाव, सोनारी, धोंडेवाडी, बहादरपूर, नाटेगाव, मढी बु., ब्राह्मणगाव, टाकळी, धामोरी, खिर्डी गणेश, घारी या ग्रामपंचायतीत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आल्याची माहीती प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी जाहीर केली.