अहमदनगर बातम्या

आयजी पथकाची जळगावमध्ये मोठी कारवाई; अहमदनगरचे तिघे गजाआड

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने गावठी कट्टे बाळगुन दरोड्याची पुर्वतयारी करणारे तीन आरोपी गजाआड केले असून दोघे पसार झाले आहेत.

गणेश बाबासाहेब केदारे (रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), कालीदास दत्तात्रय टकले (रा. हरताला, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), विकाश आप्पासाहेब गिरी (रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

जळगाव जिल्ह्यातील बोरअंजटी- वैजापूर रस्त्यावर तेल्या घाटात पथकाने ही कारवाई केली. आरोपींची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे ३ गावठी कट्टे, १४ राउंड, १ वस्तरा व एक स्कॉर्पिओ असा एकूण ६ लाख ३४ हजार १०० रूपये किंमतीचा मुद्देमाला ताब्यात घेतला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि. कलम ३९९, ४०२ सह आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहम, सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, अंमलदार बशिर तडवी, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, नारायण लोहरे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office