मानेवरचा काळेपणा हटवण्यासाठी घरीच बनवा नैसर्गिक स्क्रब, जाणून घ्या सोप्पी पद्धत!

Updated on -

दैनंदिन धावपळीच्या जीवनात आपण चेहऱ्याची नीट काळजी घेतो, फेशियल, क्लिनअप्स, स्किन केअर सगळं काही. पण दुर्लक्ष होतो तो आपल्या मानेचा. चेहरा उजळून दिसतो, पण मान मात्र काळसर, थोडीशी खवखवलेली दिसते. ही एक छोटीशी समस्या असूनही ती आपली एकूण छाप बिघडवते. म्हणूनच आज आपण अशा एका घरगुती उपायाबद्दल जाणून घेणार आहोत, जो अगदी सहज, स्वस्त आणि खात्रीशीर आहे.

ही समस्या सुरू होते मृत त्वचेच्या साचण्याने, घाम, धूळ आणि त्वचेची योग्य निगा न राखल्याने. बर्‍याच वेळा आपण साबण घासून पाहतो, स्क्रब्स वापरतो, पण ते तात्पुरते परिणाम देतात. काही जण तर महागड्या ब्लीच क्रीम्स वापरूनही थकतात, पण मान काळसरच राहते.

लिंबू आणि शाम्पू

मात्र, यावर एक असा घरगुती उपाय आहे जो अगदी काही मिनिटांत तुम्हाला फरक दाखवू शकतो. यासाठी फक्त दोन गोष्टी लागतात, त्या म्हणजे लिंबू आणि शाम्पू. या दोन्ही गोष्टी जवळजवळ प्रत्येकाच्या घरात असतात. अर्धा लिंबू घ्या आणि त्यावर हळद, कॉफी पावडर, थोडं खोबरेल तेल आणि थोडासा शाम्पू लावा. हा लिंबू मानेवर हळुवारपणे फिरवा. फक्त 2-3 मिनिटांत तुम्ही बदल अनुभवू शकता. आठवड्यातून 3-4 वेळा हा उपाय केल्यास, मानेवरचा काळेपणा लवकरच नाहीसा होतो.

बेसन आणि लिंबाचा फेसपॅक

या पद्धतीशिवाय, दुसराही एक नैसर्गिक पर्याय आहे बेसन आणि लिंबाचा फेसपॅक. एक चमचा हरभरा पीठ घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. तयार पेस्ट मानेवर लावा, 10 ते 15 मिनिटं सुकू द्या आणि नंतर स्क्रब करत पाण्याने स्वच्छ धुवा. हे मिश्रण त्वचेतील मृत पेशी दूर करते आणि नैसर्गिकपणे उजळपणा आणते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!