चंद्रशेखर घुले यांना पुन्हा आमदार करा ! तालुक्याचे गतवैभव परत मिळवू शकतो…

Pragati
Published:

आपण ठरवले तर तालुक्याचे गतवैभव परत मिळवू शकतो. ही खुणगाठ आपल्याला बांधायची आहे. चहुबाजूंनी केवळ तालुक्याचे लचके तोडण्याचे काम सुरू असतांना शिवबा घडवण्याची ताकद असलेली जिजाऊ शांत बसून कशी चालेल.

म्हणून आपल्याला पुन्हा चंद्रशेखर घुले पाटील यांना आमदार केल्याशिवाय हे थांबलेले विकासाचे चक्र पुन्हा सुरू होणार नाही. त्यामुळे आपल्या मुलाबाळांच्या आणि तालुक्याच्या भविष्याची ही लढाई आपल्या हातात घ्यायची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.

माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून शेवगाव- पाथर्डी तालुका परिवर्तन विकास आघाडीच्यावतीने आज बुधवारी (दि. १४) शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये न्यू होम मिनीस्टर, खेळ पैठणीच्या आयोजित कार्यक्रमामध्ये राजश्री घुले बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीलिमा घुले होत्या. यावेळी तेजस्विनी घुले, आशा भोसले, मनिषा आढाव, शितल थोरात, उषा मडके, रागिणी लांडे, उज्ज्वला मेरड, वसुधा सावरकर, राजश्री रसाळ, ज्योती धुत, मंगळ धुत, प्रिती गजभीव, प्रिती राठी आदी प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पैठणी साडयांसह प्रथम रोहिणी सचिन तोतरे, शेवगाव, व्दितीय- अनिता अरुण मोटकर लाखेफळ
तृतीय- श्रध्दा पानकर, दहिगांव ने, चतुर्थ भाग्यश्री प्रदिप वांढेकर, वाघोली, पाचवे वैशाली भारत मोटकर, घोटण आदींसह उत्तेजनार्थ स्पर्धकांना फ्रीज, वॉशिंग मशिन,

शिलाई मशीन, कुलर यासह विविध बक्षिसे राजश्री घुले, तेजस्विनी घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, क्षितीज घुले, अरुण लांडे, काकासाहेब नरवडे, संजय कोळगे आदींच्या हस्ते देण्यात आले. यावेळी क्रांतीनाना व सह्याद्री मळेगावकर यांचाही प्रमुख पाहण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात

आला. तालुक्यातील हजारो महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रशेखर घुले पाटील मित्र मंडळ व क्षितीज घुले युवा मंचतर्फे परिश्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक तेजस्विनी घुले यांनी तर सुत्रसंचालन दिपक कुसळकर यांनी केले. तर उज्ज्वला मेरड यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe