मला एक दिवसाचा पालकमंत्री बनवा – सुमित वर्मा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सत्ताधार्‍यांना अपयश येत आहेत. जिल्ह्याचे मायबाप म्हणून महाविकास आघाडी सरकारने पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ दिले आहेत.

परंतु जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचे त्यांना गांभीर्य नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनाच पालकमंत्री करा किंवा मला एक दिवसाचा पालकमंत्री म्हणून संधी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित वर्मा यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. सुमित वर्मा यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात पालकमंत्री यांच्या कारभारावर टीका केली आहे. कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती अतिशय बिकट आहे.

महापालिकेकडे विकासकामांसाठी पैस नाहीत. मुलभूत कामे ठप्प पडली आहेत. महावितरण अवाजवी बिले आकारत आहेत. आरोग्य यंत्रणा खोळंबली आहे.

नालेसफाई नाही. नगरकर नरकयातना भोगत आहेत. सत्ताधारी असून, देखील प्रशासनाच्या कारभारातील नियोजनावर पकड नाही, असा अनेक मुद्यांना सुमित वर्मा यांनी स्पर्श केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24