अण्णांच्या राळेगणात गैरप्रकार; मतदारांना प्रलोभने देणाऱ्यांवर भरारी पथकाची कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. यातच प्रचाराची सांगता झाली आहे. आता मतदार राजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुढारी मंडळींचे प्रयत्न सुरु झाल्याचे प्रकार दिसून येत आहे.

मतदारांना अनेक प्रलोभने दाखवत आपल्याकडे खेचण्यासाठी पुढारी मंडळी धावपळ करू लागली आहे. मात्र अशा घटनांना रोखण्यासाठी भरारी पथके देखील कार्यरत करण्यात आली आहे.

नुकतेच शुक्रवारी होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पावर्श्‍वभुमिवर राळेगणसिद्धीत सुरेश दगडू पठारे तसेच किसन मारूती पठारे यांना मतदारांना साडया वाटताना भरारी पथकाने गुरूवारी सायंकाळी रंगेहात पकडले.

दोघांनाही तहसिलदार ज्योती देवरे यांच्यापुढे हजर करण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.

राळेगणसिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्यानंतर पारंपारीक विरोधक असलेले जयसिंग मापारी तसेच लाभेश औटी यांनी हेवेदावे दुर ठेउन बिनविरोध निवड करण्यासाठी नउ उमेदवारांची नावे निश्‍चित केली.

आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी अण्णांनी देखील यास पाठिंबा दर्शविला, मात्र राजकीय अस्थिरतेतून अखेर निवडणूक घेण्याचे ठरवले.

दरम्यान ग्रामपंचायतीचा प्रचार शांततेत पार पडल्यानंतर शुक्रवारी होणा-या मतदानाच्या पार्श्‍वभुमिवर गुरूवारी सायंकाळी मतदारांना साडया वाटताना सुरेश किसन दगडू पठारे व किसन मारूती पठारे यांना भरारी पथकाचे अधिकारी तथा गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी रंगेहात पकडले.

दोघा पठारे यांच्यासोबत दोन महिलाही होत्या. पथकात महिला कर्मचारी नसल्याने महिलांना ताब्यात घेण्यात आले नाही. यांच्यावर आचारसंहितेेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसिलदार देवरे यांनी दिले. त्यानुसार दोघा पठारेंविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

अहमदनगर लाईव्ह 24