राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार : आ.तनपुरे यांना दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात जालना सहकारी साखर कारखाना आणि राम गणेश गडकरी साखर कारखाना गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आमदार प्राजक्त तनपुरे,

प्रसाद तनपुरे यांच्यासह या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दिलासा दिला. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या सर्वांना वैयक्तिक २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या सर्वांना समन्स बजावून न्यायालयात हजर रहाण्याचे निर्देश देण्यात आले होते.

राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात ईडीने याआधी पवार दाम्पत्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याबरोबरच जालना सहकारी साखर कारखाना आणि राम गणेश गडकरी साखर कारखाना गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी ईडीने या दोन्ही साखर कारखान्यांमध्ये अनावश्यक आर्थिक व्यवहार झाल्याचा ठपका ठेवून मनिलॉण्डरिंग केल्याचा आरोप केला. याची विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेतली. ईडीच्या दाव्यात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे मत व्यक्त करत

माजी आमदार अर्जुन खोतकर आणि जुगलकिशोर तापडिया यांच्यासह राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्रीप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गट आमदार प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजित देशमुख यांना समन्स बजावत न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार सर्वांनी न्यायाधीश रोकडे यांच्या न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयाने सर्वांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.