गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- मुतखड्याच्या औषधात गुंगीचे औषध टाकून येवला तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर राहुरीत बलात्कार करण्यात आला.

त्याचे फोटो व व्हिडिओ काढून नंतर वारंवार अत्याचार केल्याच्या आरोपावरून राधाकिसन बडदे (४०) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

या घटनेतील फिर्यादी १७ वर्षीय मुलीला ५ सप्टेंबर २०१८ रोजी मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने ती राहुरी शहरातील तनपुरेवाडी खळवाडी येथील बडदे याच्याकडे आली.

त्याने मुतखड्याचे औषध म्हणून गुंगीचे औषध पाजले. नंतर नग्नावस्थेतील फोटो काढून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. फोटो व व्हीडीओ शुटींगच्या आधारे वेळोवेळी तिला धमकावले.

मुलीचे वडील, भाऊ व पतीच्या मोबाइलवर फोटो व व्हिडिओ पाठवून मुलीची बदनामी केली. ५ सप्टेंबर २०१८ ते १६ डिसेंबर २०१९ दरम्यान बडदे याने राहुरी येथील राहत्या घरात,

तर कधी येवला तालुक्यातील तिच्या घरी, तसेच तिच्या सासरी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. पीडित मुलगी आता सज्ञान झाली असून तिने स्वतः राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहून फिर्याद नोंदवली. बडदे याच्या विरोधात बलात्कार व पोस्कोसह आयटी ॲक्टप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24