अहमदनगर बातम्या

तलवारीच्या जोरावर दहशत माजवणाऱ्या एकास अटक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारीच्या जोरावर दहशत माजवणाऱ्या एकास अटक केली आहे. दत्तात्रय अंबादास गोसके असे अटक करण्यात आलेल्या तलवारधारी व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दत्तात्रय अंबादास गोसके हा विनापरवाना व बेकायदा धारदार तलवार स्वतःजवळ बाळगून असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कटके यांनी तत्काळ पथक पाठवले.

पोलीस पथकाने तात्काळ तात्काळ कारवाई केली. कुंभार गल्लीत शिवसेना कार्यालयाच्या बाजूला एक इसम हातात तलवार घेऊन फिरताना दिसला.

पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office