अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील हातराळ येथील रहिवासी आणि एम एम निराळी व बाबूजी आव्हाड विद्यालयात शिक्षण घेत असलेली आरती केदार महाराष्ट्र महिला रणजी क्रिकेट संघात निवड झाली आहे.
तसेच उत्तराखंड येथे होणारे एक दिवसीय स्पर्धेसाठी आरती केदार ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच तिच्याबरोबर पाथर्डीच्या ज्ञानेश्वरी वाघ व अंबिका वाटाडे या विद्यार्थिनी सुद्धा अंडर 16, अंडर 19 महिला क्रिकेट संघात बडोदा, गुजरात, आसाम, ओडिसा या राज्यात महाराष्ट्र संघाकडून खेळल्या आहेत.
पाथर्डीच्या ग्रामीण भागातील मुलींनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र रणजी संघ अशी नेत्रदीपक कामगिरी केल्याने भविष्यात त्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व नक्की करतील असे प्रतिपादन विद्यालयाचे शिक्षक व क्रिकेट अकॅडमी चे प्रशिक्षक शशिकांत निराळी यांनी केले.