Ahmednagar News : जिल्हयासह राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर गावात पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ व गुणवत्तापुर्ण पुरवठा करा तसेच ग्रामपंचात स्तरावरील जमा होणारा ओला, सुका व प्लास्टीक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
त्या दृष्टीने ग्रामपंचायतीनी योग्य नियोजन करावे असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहेत.
पावसाळ्यात पिण्याच्या शुध्द पाण्याचा व घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता नियंत्रण करण्यासाठी पाण्याच्या स्रोताचे जलसुरक्षाकामार्फत स्वच्छता करून घेण्यात येत आहे.
तसेच ब्लिचिंग पावडरचा पुरेसा साठा करून त्याचा वापर करणे, घरगुती स्तरावर मेडीक्लोरचा वापर करण्याचे निर्देश जिल्हा स्तरावरुन देण्यात आले आहेत.
सध्या पावसाळी परिस्थीतीमुळे स्रोतातून गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्यास ग्रामस्थांनी घरगुती स्तरावर पाण्याचे स्थिरीकरण करून त्या नंतर उकळून थंड केलेले पाणी वापरावे.
परिसर स्वच्छता, गावातील ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना करणे. गावातील कचऱ्यामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे प्लास्टिक कचरा व घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन समर्थ शेवाळे प्रकल्प संचालक जलजीवन यांनी केले.
सध्या शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरात साथ रोगाचे देखील प्रचंड वाढले आहे.
जवळ जवळ सर्वच घरात ताप असणारे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने यावर उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.