मंगल कार्यालय मालकांचे आमदार जगतापांना साकडे…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील टाळेबंदी काळापासून राज्य सरकारने मंडप, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, लॉन्स, केटरिंग अ‍ॅण्ड ईव्हेंट मॅनेजमेंट, साऊंड, लाईट, डेकोरेशन आणि इतर संबंधित व्यवसायावर अनेक निर्बंध आणली आहेत.

यामुळे सदर व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले असून, या मंदीतून बाहेर येण्यासाठी या व्यवसायिकांनी आज आमदार संग्राम जगतापांना साकडे घातले आहे. विवाह सोहळ्यास 500 लोकांची उपस्थितीची परवानगी मिळावी अशी मागणी मंगल कार्यालये, मंडप डेकोरेटर्स, केटरर्स, बँड साऊंड असोसिएशनच्यावतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली.

कोरोना महामारीचे संकट व लॉकडाऊनमुळे गेल्या 7 महिन्यांपासून मंगल कार्यालय, मंडप डेकोरेटर्स, केटरर्स, बॅड, साऊंड व लग्न सोहळ्याशी संबंधित सर्व यंत्रणा अत्यंत आर्थिक अडचणीत आलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात 50 लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यास परवानगी देण्यात आली होती.

त्यानुसार गेल्या 7 महिन्यात सर्व नियम व अटींचे पालन करून हे कार्य पार पाडले. मात्र 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी असल्याने मंगल कार्यालयाची भाडे व विवाह सोहळ्याशी संबंधित इतर सर्व यंत्रणांच्या मानधनावर मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वजण आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

तसेच या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या कर्मचाऱ्यांचे पगार, लाईटबील, कार्यालयाची देखभाल व महानगरपालिकेचे विविध कर भरणे यामुळे सर्व व्यावसायिक मेटाकुटीला आलेले आहेत, या परिस्थितीत या व्यावसायिकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा व शासन दरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी जगतापांकडे केली आहे.

काही प्रमुख मागण्या

  • विवाह सोहळ्यासाठी 500 लोकांना परवानगी देण्यात यावी
  • महानगरपालिकेचे सर्व कर माफ करावे
  • बँकांचे कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी
  • कोरोना काळातील व्याजदर माफ करावा वीजबिल माफ करावे
  • जीएसटी कर 18 टक्क्यांवरुन 5 टक्के कराव.
  • या व्यावसायिकांना उद्योगाचा दर्जा द्यावा

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24