अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- बळजबरीने गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्याच्या महिलेच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याची कोतवाली पोलीस ठाण्याचे पो. नि. राकेश मानगांवकर यांनी तातडीने दखल घेत, गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या.
पोलीस पथकाने तातडीने सापळा लावून मंगळसूत्र सराईत चोरट्यास पकडले. रुपेश प्रकाश यादव (वय 37 रा. साई अपार्टमेंट वडगाव शेरी जि. पुणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या माहितीनुसार आनंदऋषी हॉस्पिटल व एस पॅलेस हॉटेल परिसरात कोतवाली गुन्हे शोध पथकाने सापळा लावला संशयित मोपेड गाडीवरील इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर आरोपी याने स्वतःचे नाव सांगितले असता, यानंतरही अधिक चौकशी त्याचाकेली परंतु त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आरोपीला पोलीस खाक्या दाखविताच, त्याने दाखल गुन्हा व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत मोपेड गाडीवरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली.
तसेच यावेळी तपासात त्याच्याकडे गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी त्याने उस्मानाबाद (जि. औरंगाबाद) येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.