अहमदनगर मधील ‘या’ गावात मनोज जरांगेच्या पदयात्रेचे होणार भोजन ! १७० एकर जागेवर नियोजन, ‘अशी’ आहे जय्यत तयारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठी बांधवांची पदयात्रा २० तारखेपासून सुरु होणार आहे.दरम्यान २२ तारखेला अहमदनगरमध्ये ही पदयात्रा असेल व या पदयात्रेतील लाखो बांधवांचे दुपारचे भोजन सुपे येथे होणार आहे.

त्या अनुशंघाने जय्यत तयारी सुरु असून सुमारे १७० एकर क्षेत्रावर बसण्याच्या व्यवस्थेसाठी जोरदार तयारी सुरू आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज २० जानेवारी पासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून पदयात्रेने मुंबईला जाणार आहे. या पदयात्रेत लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत.

ही पदयात्रा अंतरवली सराटी शाहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरुर, वाघोली, शिवाजी नगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा, पनवेल, मुंबई अशा मार्गाने जाणार आहे. याचे नियोजन पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

मराठा मोर्चा हा अहमदनगर जिल्ह्यातून जाताना नगर- पुणे महामार्गावरील सुपे या परिसरात या मोर्चाचे दुपारचे भोजन होणार आहे. यादृष्टीने तयारी सुरू आहे. मोर्चेकरांच्या अन्न, पाणी, व इतर सोयीसाठी नुकतीच पारनेर व सुपा येथे नियोजन बैठक घेण्यात आली होती.

यामध्ये महिला व पुरुष यांची वेगवेगळी व चार ते सहा ठिकाणी व्यवस्था करणे, तसेच रस्त्याच्या दुतर्फा पाणी टॅंकर उभे करणे, मोर्चा बरोबरील टॅंकर रोड लगतच्या विहरी, बोरवेलवरुन भरण्याची सोय करणे, जेवणाची पाकीटे भरुन ती विभागून वाटप करणे, त्यांना बसण्यासाठी जागा स्वच्छ करणे,

जास्तीत जास्त स्वयंसेवक महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त करणे, मोर्चात महिला मोर्चेकरी असल्याने आपल्या परिसरातील महिला स्वयंसेवक तयार ठेवणे, तसेच पारनेर तालुका हद्दीत श्रीगोंदा, संगमनेर, अकोले आदी तालुक्यातील मराठा बांधव जमा होतील यांचे नियोजन करणे,

मोर्चाचे स्वागत, जेवण, पाणी आदी गोष्टीं सह मोर्चा शिरुर पुणे जिल्ह्यातील हद्दीत सुरक्षित पोहोच होईल आदी गोष्टींवर नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने मराठा समाजाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे.

यात्रेत मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाज सहभागी होणार असून दि.२२ जानेवारी रोजी दुपारचे भोजन सुपा येथील या मैदानावर होणार असून पुढील मुक्काम हा रांजणगाव गणपती (ता.शिरूर जिल्हा पुणे) येथे होणार आहे.