Ahmednagar News : जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बँकेचे संचालक झाल्यापासून त्यांनी बँकेत अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. पण तालुक्यातील विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बुद्धीच्या कमकुवतपणामुळे त्यांना ते समजत नाहीत व ते चूकीचे आरोप करत असल्याचा दावा कर्डिले समर्थकांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी ते म्हणाले की माजी मंत्री कर्डिले यांनी कोरोना काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सन २०१९-२० मध्ये १२९.३४ कोटी वाटप केले. गेल्या ४ वर्षापासून खेळते भांडवल देण्यासाठी पुढाकार घेतला व जिल्हाभर शेतकऱ्यांची जागृती करुन थेट शेतकऱ्यापर्यंत ही योजना राबवली.

चेअरमन झाल्यानंतर अल्पमुदत कर्जमर्यादा १० हजाराने वाढवून २० हजार ऐवजी ३० हजार रुपये एवढी केली. पशुपालनासाठी २ गायींसाठी १ लाख रुपये कर्जमर्यादा होती. त्याऐजवी आता ४ गायींसाठी २ लक्ष रुपये कर्जमर्यादा वाढवली.

महिला बचत गटासाठी आग्रही पुढाकार घेवून ४.९५ कोटी कर्ज वाटले. जे शेतकरी मध्यम मुदत कर्जाचे थकबाकीदार होते त्यांना शासनच्या कर्ममाफीचा कुठलाही लाभ मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना २०१५ पूर्वीच्या एकरकमी कर्जफेड योजनेच्या माध्यमातुन दिलासा देण्यासाठी मा. चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे.

सभासद शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसायासाठी कर्ज कसे देता येईल व त्यांच्या हाताला काम मिळून शेतीला जोडधंदा देवून युवकवर्ग समृध्द कसा होईल, याचाही विचार जिल्हा बँकेमार्फत केला जात आहे. जिल्हा सहकारी बँकेकडून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत सन २०१९-२० सन २०२० – २१ पर्यंतचे व्याज प्रस्ताव मंजुर असुन, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.

तर २०२१-२२ सालातील २ लाख ५३ हजार ७८२ कर्जदार सभासदांचे ५६ कोटी ९ लक्ष रुपयांचे प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा चालु आहे. महाविकास आघाडीकडून जनतेची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती दिली जात आहे.

जिल्हा परिषदेत टक्केवारी घेऊन काम करणारे आता लोकहिताचा डांगोरा पिटत आहेत. अशी टिका त्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, रविंद्र कडुस, राजेंद्र दारकुंडे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, दिपक कार्ले, सुधीर भापकर, रामदास सोनवणे धर्मानाथ आव्हाड, शरद बोठे, भाऊसाहेब ठोंबे, मनीषा कांबळे, गणेश भालसिंग, प्रकाश दांगडे, प्रथमेश भालसिंग आदी उपस्थित होते.