अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सर्वपक्षीयांच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कराळे यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले.
कराळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी कराळे यांच्या पत्नी अथवा कुटुंबातील कोणाला तरी संधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, सुनिल परदेशी, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, रफिक शेख, गोविंद मोकाटे, अंकुश चितळे, अमोल वाघ आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved