अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांच्या रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून तब्बल ११ गावच्या पाणी पुरवठा योजनांना १०.११ कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
याबाबतची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे. दरम्यान गेल्या 5 वर्षात तालुक्यातील अनेक गावातील पाणी पुरवठा योजना रखडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत होती.
पाण्यासाठी महिलांची सततपणे होणारी वणवण थांबविण्यासाठी काळे यांनी या गावातील पाणी योजनांना मंजुरी मिळविण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करून पाठपुरावा सुरु केला होता.
त्या पाठपुराव्यातून अनेक पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाल्या आहेत. सध्या स्थितीमध्ये एकूण ११ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना १०.११ कोटी निधी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून मंजूर करण्यात आला आहे. यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.