पैशासाठी विवाहितेचा छळ : सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  बांधकाम करण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार नेवासा तालुक्यातील सोनई येथे घडला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या सहा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत विवाहीत तरुणी दिपाली गडाख ( देवळाली प्रवरा ता. राहुरी) हिच्या फिर्यादीवरुन पती गणेश देविदास गडाख,

सासू मंदा देविदास गडाख, सासरे देविदास नारायण गडाख, मामा सासरे अर्जुन गणपत ढुस, नणंद मंगल किशोर बंगाळ, मावस दिर अंकुश घाडगे या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला पोलिसांनी दिलेल्या

Advertisement

माहितीनुसार २१ नोव्हेंबर २०१६ नंतर एक वर्षापासून ते २५ एप्रिल २०२१ या दरम्यान दिपाली हिने बांधकाम करण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावेत.

या मागणीसाठी सासरच्या लोकांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. तिला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन घरातून बाहेर हाकलून दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे

Advertisement