विवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रहिवाशी महिला अनिता उर्फ उषा पोपट साळवे (वय-२७) हीचा मृतदेह निवास स्थानापासून सुमारे दीड की.मी.अंतरावर असलेल्या ग.क्रं.८१ मध्ये असलेल्या विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली असून

या बाबत मयत महिलेच्या पित्याने याबाबत तिला माहेरून नोकरीस पैसे आणण्याच्या कारणावरून छळ सुरु असल्यानेच आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,अकोले तालुक्यातील नवलेवाडी

येथील तरुणी अनिता शेलार हीचा विवाह कोपरगाव तालुक्यातील येसगाव भैरववाडी येथील तरुण पोपट लक्ष्मण साळवे यांचेशी दि.२४ मे २०१० रोजी मुलीच्या पित्याने मोठ्या धुमधडाक्यात लावून दिला होता.मात्र नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर येसगाव येथील सासरच्या मंडळीने आपले अवगुण उधळण्यास सुरुवात केली.

त्यांनी जावयास नोकरी लावण्यासाठी नवविवाहितेने ०५ लाख रुपये आणावे यासाठी तिचा शारीरिक,मानसिक छळ सुरु केला होता.मात्र सुरुवातीस आपण त्याकड़े दुर्लक्ष केले.मात्र तो त्रास दिवसेंदीवस वाढत गेला.व नंतर तो खूपच वाढल्याने आपल्या मुलीने ती शेवट-शेवट खूपच त्रासाला कंटाळली होती.

शुक्रवार दि.२५ सप्टेंबर सायंकाळी ४ वाजे पासून गायब झाली होती.त्याबाबत शोध घेऊनही ती मिळून आली नव्हती.मात्र आज सकाळी काही इसमानी सदर महिलेचा मृतदेह नजीकच्या विहिरीत असल्याची माहिती दिल्याने याबाबत ग्रामस्थांनी कोपरगाव तालुका पोलिसांना खबर दिली.

पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना सादर महिला वरील क्रमांकाच्या विहिरीत तरंगताना आढळून आली.त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने तिचे शव विहिरी बाहेर काढून ते कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले आहे.

याबाबत मयत महिलेचे पिता भागीनाथ नागू शेलार (वय-५३) रा.नवलेवाडी ता.येवला यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची फिर्याद दाखल केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24